मुंबईमध्ये संरक्षक भिंतीच्या कामात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचं लोकशाही मराठीनं उघड केलं आहे. रोज एका ठिकाणच्या संरक्षक भिंतीची पोलखोल लोकशाही मराठी करत आहे. मुलुंडमध्ये अमरनगर परिसरात लोकशाहीच्या टीमने संरक्षक भिंतींची पाहणी केली. दरम्यान येथील वास्तव वेगळंच असलेलं पाहायला मिळालं आहे.
मुलुंडमध्ये 10 वर्षांत कागदोपत्री अनेक संरक्षक भिंती असून 10 वर्षांत 33 कोटींपेक्षा अधिकच्या संरक्षक भिंती आढळून आलेल्या आहेत. 2016 साली ही संरक्षक भिंत कलंडली होती, त्यानंतर या संरक्षक भिंतीचं काम पूर्ण व्हायला 2022 साल उजाडल्याचं स्थानिकांनी सांगितल आहे. हे सांगताना स्थानिक त्यांचे कटू अनुभवही सांगत होते. भिंत कलंडली होती, त्यावेळी स्वत:च्या घरात झोपतानाही त्यांना भिती वाटत होती असं स्थानिक सांगत होते.
मुलुंड परिसरात 2014 ते 2024 या कालावधीत अनेक संरक्षक भिंतींचे काम झाल होत. त्यासाठी 32 कोटींपेक्षा अधिक निधी खर्च झाल्याचं झोपडपट्टी सुधार मंडळाच्या लेखाजोख्यावरून निदर्शनास आलं होत. मात्र, प्रत्यक्षात 2016 साली कलंडलेली संरक्षक भिंत 2022 साली बांधून पूर्ण झाली होती.
त्याचबरोबर या भिंतीची रंग रंगोटीही नुकतीच दहा दिवसांपूर्वी झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. झोपडपट्टी सुधार मंडळानं म्हाडाच्या कोट्यवधी पैशांवर डल्ला मारल्याचं भयाण वास्तव लोकशाही मराठीनं समोर आणलं आहे.
Lokशाही मराठीचा दणका
21 जानेवारी विक्रोळीतील 38 कोटींच्या संरक्षक भिंतींची पाहणी
24 जानेवारीला अंधेरी महाकाली केव्हज येथे 8 कोटींच्या संरक्षक भिंती
25 जानेवारी दहिसर येथे 55 कोटींचा संरक्षक भिंत घोटाळा
27 जानेवारी मुलुंडमध्ये 33 कोटींच्या संरक्षक भिंतींची पाहणी
मुलुंडमध्ये 10 वर्षांत 33 कोटींच्या संरक्षक भिंती
2014-2015 - 3 कोटी 99 लाख
2016-2017 - 5 कोटी 67 लाख
2017-2018 - 3 कोटी 63 लाख
2018-2019 - 2 कोटी 92 लाख
2019-2020 - 5 कोटी 78 लाख
2020 -2021 - 1 कोटी 27 लाख
2021-2022 - 6 कोटी 92 लाख
2022-2023- 3 कोटी 14 लाख
2023-2024 - 47 लाख
एकूण - 33 कोटी 79 लाख