Bhandup Bus Accident : Bhandup Bus Accident :
ताज्या बातम्या

Bhandup Bus Accident : भांडूपची काळरात्र! बस अपघातात चौघांचा मृत्यू, अवघ्या 25 वयात जीव गमावला

भांडूप पश्चिम परिसरात स्टेशनजवळ काल रात्री घडलेल्या भीषण बस दुर्घटनेमुळे संपूर्ण मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अनेक नागरिक आपापल्या कामावरून घरी परतत होते.

Published by : Riddhi Vanne

Bhandup Bus Accident : भांडूप पश्चिम परिसरात स्टेशनजवळ काल रात्री घडलेल्या भीषण बस दुर्घटनेमुळे संपूर्ण मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अनेक नागरिक आपापल्या कामावरून घरी परतत होते. काहीजण पायी निघाले होते, तर काही बस पकडण्यासाठी थांबले होते. अशाच वेळी एका इलेक्ट्रिक बसचा अचानक अपघात झाला. बस मागे घेत असताना चालकाचा ताबा सुटला आणि बस अनियंत्रितपणे मागे सरकली. रस्त्यावर आणि बसथांब्यावर उभ्या असलेल्या लोकांना जोरदार धक्का बसला. काहींनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला, मात्र काही जणांना संधीच मिळाली नाही. गोंगाट, लोकांच्या किंकाळ्या आणि ब्रेकचा आवाज यामुळे परिसरात एकच गडबड उडाली.

या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका व्यक्तीला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

मृत्यू झालेल्या नागरिकांची नावे

1. प्रणिता संदीप (वय ३५)

2. वर्षा सावंत (वय २५)

3. मानसी गुरव (वय ४९)

4. प्रशांत शिंदे (वय ३५)

जखमींची माहिती

1. प्रशांत लाड (वय ५१) – उपचारानंतर घरी सोडले

2. नारायण कांबळे (वय ४९) – उपचार सुरू

3. मंगेश दुखंडे (वय ४५) – उपचार सुरू

4. ज्योती शिर्के (वय ५५)

5. शीतल हडवे (वय ३९) – किरकोळ दुखापत

6. रामदार रुपे (वय ५९) – किरकोळ दुखापत

7. प्रताप कोरपे (वय ६०) – उपचार सुरू

8. रविंद्र घाडिगांवकर (वय ५६) – उपचार सुरू

9. दिनेश सावंत (वय ४९) – प्रकृती स्थिर

10. पूर्वा (वय १२) – उपचार सुरू

या अपघातानंतर बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची सखोल चौकशी सुरू असून तो मद्यधुंद अवस्थेत होता का, बसमध्ये तांत्रिक अडचण होती का, तसेच चालकाचा अनुभव किती होता, यासह सर्व बाबी तपासल्या जात आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

थोडक्यात

• भांडूप पश्चिम स्टेशनजवळ काल रात्री घडलेल्या भीषण बस दुर्घटनेमुळे मुंबईत हळहळ
• रात्री सुमारे १० वाजता नागरिक कामावरून घरी परतत असतानाच अपघात
• काही नागरिक पायी तर काही बस पकडण्यासाठी थांबले होते
• इलेक्ट्रिक बस मागे घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याची प्राथमिक माहिती
• बस अनियंत्रितपणे मागे सरकल्याने रस्त्यावर व बसथांब्यावर उभ्या लोकांना जोरदार धक्का

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा