सध्या महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट आली आहे. पूर्वेकडील गरम वाऱ्यांमुळे मुंबईसह ठाणे,पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या भागातील तापमान 40 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आता राज्यभरात 11 मार्च पर्यंत उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
यावर्षी होळीच्या आधीच राज्यातील तापमानामध्ये वाढ झालेली बघायला मिळत आहे. यावेली फेब्रुवारी महिन्यामध्येच उष्णतेची पहिली लाट आली होती. मात्र काही दिवसानंतर हवेमध्ये थोडा गारवादेखील आला होता. हवामान खात्याच्या विभागाने ही तापमानातील घट तात्पुरती असल्याचे सांगितले होते. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये अधिक उष्णता आणि दमट हवामान यामुळे हा उकाडा अधिक जाणवू शकतो.
आयएमडीने नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ज्या भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, त्या ठिकाणी लोकांनी शक्यतो दुपारच्या उन्हात फिरणे टाळावे. उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक सावधगिरी बाळगावी, पुरेसं पाणी प्यावं आणि हलका आहार घ्यावा.
राजसरकारने दिल्या खबरदारीच्या सूचना
दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.
पुरेसे पाणी प्या आणि शरीराला हायड्रेट ठेवा.
बाहेर पडताना टोपी, गॉगल आणि कॉटनचे हलके कपडे परिधान करा.
उन्हाचा त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.