आयपीएल 2025 चा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. आयपीएलच्या 18 व्या हंगामाचे टॉप 4 संघ आता स्पष्ट झाले आहेत. लवकरच क्वालिफायर सामने खेळले जाणार असून त्यातून कोणते दोन संघ फायनल्समध्ये प्रवेश करतील, याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना आहे. समाधानकारक म्हणजे हंगामाच्या सुरूवातीला सर्वात खालच्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सनं (MI) टॉप चारमध्ये जागा मिळवली आहे. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात MI नं प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या पराभवामुळं मुंबई इंडियन्स गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. मुंबई चौथ्या स्थानावर असल्यानं त्यांना प्लेऑफमध्ये एलिमिनेटरचा सामना खेळावा लागणार आहे. कोणता संघ MI विरुद्ध एलिमिनेटरचा सामना खेळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र यापूर्वी चार वेळा एलिमिनेटर सामने खेळल्यामुळे याहीवेळी मुंबई इंडियन्सन क्वालिफायर राऊंडला येईल, असा त्यांच्या चाहत्यांना विश्वास आहे.
आयपीएलमध्ये टॉप 4 मध्ये आलेल्या संघांपैकी पहिल्या दोन संघांमध्ये क्वालिफायर 1 चा सामना खेळवला जातो. तर एलिमिनेटरचा सामना तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघात होतो. हा सामना जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफायर 2 चा सामना खेळतो. क्वालिफायर 2 मधील दुसरा संघ हा पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत संघ असतो. तर क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर 2 हे सामने जिंकणारे संघ अंतिम फेरीत येतात. सध्या क्वालिफायर 1 मधील एक संघ निश्चित झाला असून पंजाब किंग्ज सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर गुजरात टायटन्स आणि MI च्या पुढं असल्यानं क्वालिफायर 1 चा सामना खेळणार आहे. शिवाय, चौथ्या स्थानावरील MI देखील एलिमिनेटरचा सामना खेळणार, हे निश्चित आहे.
यापूर्वी 2011 मध्ये MI नं एलिमिनेटरमध्ये क्वालिफायर 2 मध्ये धडक दिली होती, त्या सामन्यात मुंबई पराभूत झाली. 2012 मध्ये MI चा एलिमिनेटरमध्ये पराभव झाला होता. 2014 मध्ये MI एलिमिनेटरमध्ये पराभूत झाली. 2023 मध्ये MI एलिमिनेटर मॅच जिंकली मात्र क्वालिफायर 2 मध्ये पराभूत झाली होती. MI आयपीएलमध्ये चारवेळा एलिमिनेटरचे सामने खेळले. त्यात त्यांना दोन वेळा पराभव स्वीकारावा लागला, तर दोनवेळा क्वालिफायर 2 मध्ये पराभव स्वीकारावा लागला.