ताज्या बातम्या

MI vs LSG : घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सनं लखनौला केलं 'All Out'; संघ आला दुसऱ्या क्रमांकावर

आयपीएलच्या 45 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघ एकमेकांशी भिडले.

Published by : Rashmi Mane

आयपीएलच्या 45 व्या सामन्यात 'मुंबई इंडियन्स' (एमआय) आणि 'लखनौ सुपर जायंट्स' (एलएसजी) संघ एकमेकांशी भिडले. रविवारी दुपारी मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं एलएसजीवर 54 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पहिली फलंदाजी घेत एमआयने 7 गडी गमावून 215 धावा केल्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये एलएसजीने केवळ 161 धावा बनवल्या. आजच्या सामन्यात एमआयच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत एलएसजीच्या सर्व खेळाडूंना बाद केले. त्यामुळे एमआयची टीम आता गुण तक्त्यात थेट दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.

या सामन्यात जसप्रीत बुमराहनं 4 विकेट घेतल्या असून त्याच्या पाठोपाठ ट्रेन्ट बोल्टनं 3 विकेट घेतल्या. तर व्हील जॅकनं दोन विकेट घेतल्या. एलएसजेचा कोणताही खेळाडू 50 पर्यंतच्याही धावा करू शकता नाही. तर एमआयच्या रियान रिकेल्टॉननं 58 आणि सूर्यकुमार यादवनं 54 धावा करत एमआयची फलंदाजीची बाजू सांभाळली. परिणामी, 10 पैकी 6 सामने जिंकून 12 पॉईंट्ससह मुंबई इंडियन्सनं पाचव्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Nashik-Mumbai Highway Accident : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! बस चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...15 ते 20 प्रवासी

Beed Rain : बीडमध्ये पावसाचा हाहाकार! सहा गावांमध्ये 44 जण अडकले, बचाव मोहिमेसाठी...

Asia Cup 2025 IND vs PAK : हस्तांदोलन वादावरून पाकिस्तानचा संताप उफाळला! आयसीसीसमोर ठेवले अल्टिमेटम