मुंबई इंडियन्सने आयपीएल IPL 2025 च्या प्लेऑफमध्ये दमदार प्रवेश करत दिल्ली कॅपिटल्सचा DC 59 धावांनी पराभव केला. या विजयानंतर दिल्लीचे या मोसमातील आव्हान संपुष्टात आले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 180 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीचा डाव 18.2 षटकांत 121 धावांमध्ये आटोपला.
मुंबईकडून सूर्यकुमार यादव Suryakumar Yadav ने आक्रमक अर्धशतक झळकावत सामन्याचा केंद्रबिंदू ठरला. शेवटच्या दोन षटकांत मुंबईने तब्बल 48 धावा फटकावल्या. सूर्यकुमारने अखेरच्या षटकात दुश्मंता चमिराला दोन चौकार व दोन षटकारांसह एकूण 21 धावा घेतल्या. त्याला नमन धीरची साथ लाभली, ज्याने 19 व्या षटकात दोन षटकार आणि दोन चौकार लगावले. याआधी, मुंबईची सुरुवात काहीशी डळमळीत होती. रोहित शर्मा Rohit Sharma लवकर बाद झाल्यानंतर रिकेल्टन आणि विल जॅक्सही झटपट माघारी परतले. 58 धावांवर 3 बळी गमावल्यानंतर सूर्यकुमार व तिलक वर्मा Tilak Verma यांनी 55 धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तिलक आणि त्यानंतर हार्दिक पंड्या hardik pandya स्वस्तात बाद झाले
गोलंदाजीत मिचेल सँटनरने प्रभावी कामगिरी करत 3 बळी घेतले. त्याने 15 व्या षटकात रिझवी आणि आशुतोष शर्माला बाद करून दिल्लीच्या डावाला हादरा दिला. दिल्लीसाठी फलंदाजीत समीर रिझवी व विपराज निगम यांच्याकडून थोडा प्रतिकार झाला, परंतु इतर प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. कर्णधार फाफ डुप्लेसिस captain Faf du Plessis, लोकेश राहुल, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल अपयशी ठरले. दिल्लीचा डाव 3 बाद 55 वरून 7 बाद 104 अशी घसरगुंडी झाली.
विशेष म्हणजे, दिल्लीच्या नेतृत्वाची धुरा आजारी अक्षर पटेलऐवजी फाफ डुप्लेसिसकडे सोपवण्यात आली. 40 वर्षे 312 दिवसांच्या वयात मैदानात उतरलेला डुप्लेसिस आयपीएल इतिहासातील चौथा सर्वाधिक वयाचा कर्णधार ठरला. त्याच्या आधी महेंद्रसिंग धोनी Ms Dhoni, शेन वॉटसन आणि ॲडम गिलख्रिस्टचा क्रमांक लागतो. नाणेफेकीसाठी दिल्लीकडून कर्णधार फाफ डुप्लेसिस आल्याने सर्वांनाच धक्का बसला. आजारी पडल्याने नियमित कर्णधार अक्षर पटेल मुंबईविरुद्ध खेळू शकणार नसल्याचे डुप्लेसिसने सांगितले. यासह 40 वर्षे 312 दिवस या वयामध्ये दिल्लीचे नेतृत्व करत डुप्लेसिस चौथा वयस्क आयपीएल कर्णधार ठरला.