Mega Block Team Lokshahi
ताज्या बातम्या

रविवारी घराबाहेर बाहेर पडण्याचा प्लॅन असेल तर वेळापत्रक पाहा; उद्या मध्य आणि हार्बर मार्गांवर 'मेगाब्लॉक'

उद्या मध्य आणि हार्बर मार्गांवर 'मेगाब्लॉक' घेण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

उद्या मध्य आणि हार्बर मार्गांवर 'मेगाब्लॉक' घेण्यात येणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे हार्बर लाईन सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत ब्लॉक असेल.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे इथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. दरम्यान, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे दरम्यान, पाचवी आणि सहावी लाईन सकाळी 11 ते दुपारी 3.30 पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या डाऊन आणि अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहार दरम्यान, डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतील. यासंदर्भातील माहिती मध्यरेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करुन देण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते

Chhagan Bhujbal : "मिळालेलं आरक्षण नको आहे का?" छगन भुजबळांचा मराठा समाजाला थेट सवाल!