Mumbai Local Train New Stations : लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.आता विरार ते डहाणू मार्गावर नवीन 7 स्थानक उभारण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे नक्कीच येत्या दोन वर्षात वेस्टन लाईनने प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ व सोयीचा होणार यात काही शंकाच नाही.
या प्रकल्पाची मुंबई रेल्वे विकास महामंडळ अंमलबाजणीकरत असून जून 2027 पर्यंत प्रकल्प पुर्ण होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे खर्च 578 कोटी रुपये इतका असू शकतो. दरम्यान या मार्गाचं चौपटीकरण आणि नव्या स्थानकांची उभारणी करणार आहेत.
नव्या स्थानकांच्या उभारणीचे 41 टक्के काम झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.तसेच तांत्रिक काम सुरु आहे. या स्थानकांच्या मदतीने डहाणू ते पालघर दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी प्रवास अधिक सोपा आणि कमीवेळेत होईल.
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या इतिहासात पाहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन स्थानकांची उभारणी केली जात आहे. यामुळे मुंबई तसेच शहरांपासून लांब राहणाऱ्या नागरिकांनाची शहारांशी संबध जोडला जाईल.
कोणती असणार ही नवी स्थानकं? यादी जाणून घ्या...
1 वाधीव
2 सरतोडी
3 माकूणसर
4 चिंतूपाडा
5 पांचाली
6 वांजरवाडा
7 बीएसईएस कॉलनी