ताज्या बातम्या

Mumbai Local Updates : मध्य रेल्वे वाहतूक कोलमडली, प्रवाशांचे हाल

मुंबईकडे येणाऱ्या 6 लोकल आणि एक्सप्रेस रखडल्या

Published by : Shamal Sawant

मुंबईची लाईफलाइन लोकल ट्रेनसंदर्भातील एक महत्त्वाची घटना समोर आली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे.मध्य रेल्वेची कल्याण ते कसारा दरम्यानची मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

वेगवेगळ्या स्थानकांत मुंबईकडे येणाऱ्या 6 लोकल आणि एक्सप्रेस रखडल्या आहेत.टिटवाळा जवळील खडवली रेल्वे स्थानकाजवळ अज्ञातानी रुळालगत असलेल्या सिग्नलच्या वायर तोडल्या, त्यामुळे सिग्नल बंद पडले, याचाच फटका मुंबईकडे येणाऱ्या वाहतूकीला बसला आहे.

कसारा इथून सुटणाऱ्या लोकल तसेच नाशिक मार्गाने मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस यामुळे थांबून आहेत, जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहतूक सूर होणार नाही. मुंबईकडे येणाऱ्या लोकल रखडल्याने कसारा दिशेने जाणाऱ्या लोकलवार देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सिग्नलच्या वायर दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा