मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्यांच्या प्रवासात अधिक खर्चाची वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रोमध्ये भाडेवाढ होणार असल्याची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो 2 (अ) आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7 मार्गिकेसाठी भाडे निर्धारण समिती गठीत करण्याचा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
अपेक्षित प्रवासी संख्येपेक्षा कमी प्रवासी प्रवास करत असल्याने मेट्रोचे उत्पन्न घटलं आहे. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याची स्थिती असल्यानं मेट्रोच्या भाडेवाढीचा हा प्रस्ताव देण्यात आला आहे. हाच प्रस्ताव राज्य करकारकडे ऑगस्ट महिन्यात पाठविला होता तेव्हा त्याला राज्य सरकारने गेल्या महिन्यात दिली होती मंजुरी.
त्यानंतर राज्य सरकारने समिती गठित करणारा प्रस्ताव गेल्या महिन्यातच केंद्र सरकारच्या सॉल्ट पॅन कडे पाठविला. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली जाणार.