मेट्रो वेग वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. मार्गिकांवरील नियमित संचालनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल आहे. दहिसर - अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ' आणि 'दहिसर - गुंदवली मेट्रो 7' मार्गिकांवरील मेट्रो गाड्या आता सुसाट चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दोन्ही मार्गिकांवरील नियमित संचालनासाठी रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्त (सीसीआरएस), नवी दिल्ली यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे आता या दोन्ही मेट्रो मार्गिकांवरील मेट्रा गाड्या ताशी 50 ते 60 किमीऐवजी ताशी 80 किमी वेगाने धावणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) 337 किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील 'मेट्रो 2 अ' मार्गिका 18.6 किमी लांबीची असून यात 17 स्थानकांचा समावेश आहे. तर 'मेट्रो 7' मार्गिका16.5 किमी लांबीची असून यावर एकूण स्थानकांचा 13 समावेश आहे. या दोन्ही मार्गिकांचा पहिला टप्पा एप्रिल 2022 मध्ये, तर दुसरा टप्पा जानेवारी 2023 मध्ये वाहतूक सेवेत दाखल आणि या दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्या.
या दोन्ही मार्गिकांना आता हळूहळू मुंबईकरांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. आजघडीला या दोन्ही मार्गिकांवरून अडीच लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. आतापर्यंत या मार्गिकांवरून 15 कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. अतिवेगवान आणि सुकर, सुरक्षित प्रवासामुळे मेट्रोला प्रवाशांची पसंती मिळते.मुंबईकरांना शाश्वत, पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक वाहतूक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.
या दोन्ही मेट्रो मार्गिकांना नियमित संचालनासाठी प्रमाणपत्र मिळणे ही एक मोठी उपलब्धी असून मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर हे प्रमाणपत्र म्हणजे 'एमएमआरडीए'च्या वचनबद्धतेचा दाखला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या प्रमाणपत्रामुळे आता मेट्रो गाड्यांचा वेग वाढेल, असा विश्वास महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला.