(Mumbai mhada Lottery Soon Dadar Tardeo Powai House ) (Mumbai mhada Lottery Soon Dadar Tardeo Powai House )
ताज्या बातम्या

Mumbai Mhada Lottery : मुंबईकरांसाठी खुशखबर! मुंबईच्या पॉश एरियात आता म्हाडाच घर

(Mumbai mhada Lottery Soon Dadar Tardeo Powai House ) मुंबईत राहण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने पुन्हा एकदा सुवर्णसंधी दिली आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर म्हाडा आता सुमारे 100 घरांची विक्री करणार आहे.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • मुंबईत राहण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने पुन्हा एकदा सुवर्णसंधी.

  • ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर म्हाडा आता सुमारे 100 घरांची विक्री करणार आहे.

  • म्हाडाची घरे खासगी प्रकल्पांच्या तुलनेत स्वस्त असल्याने त्यासाठी नेहमी मोठा प्रतिसाद मिळतो.

( Mumbai Mhada Lottery) मुंबईत राहण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने पुन्हा एकदा सुवर्णसंधी दिली आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर म्हाडा आता सुमारे 100 घरांची विक्री करणार आहे.

ही घरे मुंबईतील दादर, ताडदेव, पवई आणि तुंगा अशा उच्चभ्रू भागांत असून, तीन वेळा सोडतीत विकली न गेलेली घरे या योजनेत समाविष्ट केली जाणार आहेत. यासाठी लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

म्हाडाची घरे खासगी प्रकल्पांच्या तुलनेत स्वस्त असल्याने त्यासाठी नेहमी मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र या वेळी घरांचे दर कोट्यवधी रुपयांत असल्याने सामान्य नागरिकांना ती परवडतील का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. उदाहरणार्थ, ताडदेव येथील काही घरांची किंमत पूर्वी साडेसात कोटी रुपये होती, जी नंतर कमी करण्यात आली होती. सध्या म्हाडाची ही नवी योजना मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी ठरू शकते, परंतु किंमत परवडणं हेच सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा