मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार तयारी सुरू केली असून, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, मनसे निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मनसेकडून प्रभाग क्रमांक 8 मधून कस्तुरी रोहेकर, तर प्रभाग क्रमांक 18 मधून सदिच्छा मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच प्रभाग क्रमांक 102 मधून अनंत हजारे आणि 106 मधून सत्यवान दळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत महिलांसह तरुण आणि अनुभवी कार्यकर्त्यांना संधी देण्यात आल्याचे पाहायला मिळते.
मनसेने जाहीर केलेल्या यादीत विविध भागांतील स्थानिक कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात आले असून, मुंबईतील मराठी मतदारांवर लक्ष केंद्रीत करत रणनीती आखण्यात आल्याचे राजकीय जाणकार सांगतात. वॉर्ड क्रमांक 8, 10, 11, 18, 20, 21, 27, 38, 55, 58, 67, 68, 81, 84, 98, 102, 106, 110, 115, 129, 133, 139, 143, 150, 152, 183, 192, 197, 205, 207, 209, 214, 217, 226, 36, 216 आणि 233 मधून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज असल्याचे या यादीवरून स्पष्ट होते. आगामी काळात मनसेकडून आणखी उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता असून, निवडणुकीत मनसे कितपत प्रभाव पाडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेच्या राजकारणात या यादीमुळे नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबई महापालिकेसाठी मनसेच्या उमेदवारांची यादी
वार्ड क्र. 8 – कस्तुरी रोहेकर
वॉर्ड क्र. 10 – विजय कृष्णा पाटील
वॉर्ड क्र. 11– कविता बागुल माने
वॉर्ड क्र. 18 – सदिच्छा मोरे
वॉर्ड क्र. 20 – दिनेश साळवी
वॉर्ड क्र. 21 – सोनाली देव मिश्रा
वॉर्ड क्र. 27– आशा विष्णू चांदर
वॉर्ड क्र. 38 – सुरेखा परब लोके
वॉर्ड क्र. 55– शैलेंद्र मोरे
वॉर्ड क्र. 58 – वीरेंद्र जाधव
वॉर्ड क्र. 67 – कुशल सुरेश धुरी
वॉर्ड क्र. 68 – संदेश देसाई
वॉर्ड क्र. 81 – शबनम शेख
वॉर्ड क्र. 84 – रूपाली दळवी
वॉर्ड क्र. 98– दिप्ती काते
वॉर्ड क्र. 102– अनंत हजारे
वॉर्ड क्र. 106 – सत्यवान दळवी
वॉर्ड क्र. 110 – हरीनाक्षी मोहन चिराथ
वॉर्ड क्र. 115– ज्योती अनिल राजभोज
वॉर्ड क्र. 129 – विजया गिते
वॉर्ड क्र. 133– भाग्यश्री अविनाश जाधव
वॉर्ड क्र. 139– शिरोमणी येशू जगली
वॉर्ड क्र. 143 – प्रांजल राणे
वॉर्ड क्र. 150– सविता माऊली थोरवे
वॉर्ड क्र. 152 – सुधांशू दुनबळे
वॉर्ड क्र. 183 – पारूबाई कटके
वॉर्ड क्र. 192– यशवंत किल्लेदार
वॉर्ड क्र. 197 – रचना साळवी
वॉर्ड क्र. 205 – सुप्रिया दळवी
वॉर्ड क्र. 207 – शलाका आरयन
वॉर्ड क्र. 209 – हसीना महिमकर
वॉर्ड क्र. 214 – मुकेश भालेराव
वॉर्ड क्र. 217 – निलेश शिरधनकर
वॉर्ड क्र. 226 – बबन महाडिक
वार्ड क्र. 36 – प्रशांत महाडिक
वार्ड क्र. 216 – राजश्री नागरे
वार्ड क्र. 233 – प्रशांत गांधी