मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार यादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या दुबारच मतदार यादीत नव्हे तर मतदार 103 बार 4 व्यक्तींची नाव असलेले आहेत. मुंबईत तब्बल 4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता फोटोसहित दुबार मतदारांची यादी पालिकेकडे प्राप्त झाल्याने ऑफिसमध्ये बसून दुबार मतदारांवर काम केले जाणार आहे. 4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे वारंवार नोंदवली गेल्यानं अश्या डुप्लीकेट मतदारांची संख्या सुमारे 11 लाखांवर गेली आहे.
मतदान केंद्र निहाय यादी 22 डिसेंबर ला जाहीर करण्यात येणार
दुबार मतदार वार्डमध्ये आहे की नाही हे टॅली करून फोटोग्राफ मतदार यादी वॉर्ड मध्ये अधिकारी कर्मचारी पाहणार आहेत. 10 डिसेंबर पर्यंत पालिकेचे कर्मचारी बीएलओ कोणाच्याही घरी जाणार नाहीत. दुबार मतदारांचे सध्या 10 डिसेंबर पर्यंत परिशिष्ट 1 भरून घेतले जाणार नाही. मतदान केंद्र निहाय यादी 22 डिसेंबर ला जाहीर करण्यात येणार आहे.
विरोधी पक्षांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. प्रारुप मतदार यादीतील या प्रश्नांना उत्तर देत संभाव्य दुबार मतदारांची वार्डप्रमाणे आकडेवारी समोर आली असून 11 लाखांहून अधिक दुबार मतदार असल्याचे समोर आलं आहे. मुंबई महानगरपालिकेने 11,01,505 एवढी दुबार नावे प्रसारित केलेल्या यादीत आहेत. एस. वार्डमध्ये सर्वाधिक दुबार मतदार असून येथे 69500 दुबार मतदारांची संख्या नोंद झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
महापालिका निवडणुकांसाठी आधी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख 6 नोव्हेंबर 2025 ठरली होती आणि ती पुढे ढकलत 20 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली. मुळात 13 महिने तुम्ही गेले मतदार याद्याच प्रसिद्ध केल्या नाहीत, आगामी महापालिका निवडणुकांसाठी त्यात जी यादी जी सगळ्यात महत्वाची आहे ती प्रसिद्ध करून त्यावर हरकती घ्यायला 8 दिवस दिलेत.. हे काय आहे? तुम्ही प्रसिद्ध केलेल्या याद्या मुळात सदोष. त्यात धड कोणती माहिती नाही. त्यावर बरं राजकीय कार्यकत्यांना काम करायचं असेल तर तुम्ही ज्या याद्या प्रसिद्ध केल्यात त्या फक्त वाचण्यास योग्य. मग त्यावर काम करायचं तर त्याच्यावर काही तांत्रिक संस्कार करा त्यालाच काही दिवस लागतात. मुळात या याद्या एडिटेबल फॉरमॅट मध्ये का नाहीत? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.