ताज्या बातम्या

BMC Housing Lottery : मुंबई महापालिकेच्या 426 घरांसाठी दिवाळीत लॉटरी!

426 घरांसाठी दिवाळीत लॉटरी महापालिकेला (BMC Housing Lottery) भूखंडाच्या निवासी प्रकल्पातून बिल्डरकडून मिळालेल्या घरांमधील काढण्यात येणार आहे. आजपासून 14 नोव्हेंबरपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • मुंबई महापालिकेच्या 426 घरांसाठी दिवाळीत लॉटरी!

  • 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपासून ऑनलाईन अर्ज

  • अत्यल्प आणि अल्प गटासाठी या सदनिका उपलब्ध

426 घरांसाठी दिवाळीत लॉटरी महापालिकेला भूखंडाच्या निवासी प्रकल्पातून बिल्डरकडून मिळालेल्या घरांमधील काढण्यात येणार आहे. आजपासून 14 नोव्हेंबरपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत.अल्प आणि अत्यल्प गटासाठी 26 ते 38 चौरस मीटर चटई क्षेत्र व असलेल्या या घरांची किंमत 54 लाखांपासून 1 कोटी 12 लाखांपर्यंत आहे. 15 अंतर्गत 4 हजार चौरस फुटापेक्षा मोठय़ा भूखंडावरील निवासी प्रकल्पातून विकास नियंत्रण नियमावली विकासकाने 80 टक्के घरांची विक्री केल्यानंतर पालिकेला 20 टक्के घरे पालिकेला मोफत देणे अनिवार्य आहे.

यानुसार पालिकेला 800 घरे मिळाली आहेत. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार ही लॉटरी प्रक्रिया राबवण्यात येत आहे. दरम्यान, या सोडतीसंदर्भात 022-22754553 या मदत सेवा क्रमांकावर किंवा bmchomes@mcedgmed.goved.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा अथवा सहाय्यक आयुक्त (मालमत्ता), चौथा मजला, विस्तारित इमारत, पालिका मुख्यालय, फोर्ट इथे संपर्क साधावा.

20 नोव्हेंबरला सोडत

16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपासून ऑनलाईन अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होईल. अर्जदारांना 14 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरता येतील. अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम 14 नोव्हेंबर रात्री 11.59 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येईल.

18 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पात्र अर्जदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल आणि 20 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता सोडत प्रक्रिया पार पडेल. 16 नोव्हेंबर रोजी सोडतीसंदर्भात माहिती पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

घरे कुठे आहेत?

भायखळा

गोरेगाव

अंधेरी

जोगेश्वरी

कांदिवली

दहिसर

कांजूरमार्ग

भांडूप

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा