ताज्या बातम्या

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज; 15 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षांचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण तयारी करत असते.

Published by : Siddhi Naringrekar

सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षांचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण तयारी करत असते. थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे नियोजन करण्यात येते. अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करतात.

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असून 15 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यासोबतच 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह'च्या विरोधात पोलिस विशेष मोहीम राबविणार आहेत. चौपाट्यांच्या ठिकाणी पोलीस उपायुक्तांच्या निगराणीखाली विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बरोबरच सशस्त्र दल, राज्य राखीव दल, बॉम्बशोधक आणि नाशक पथके, श्वान पथके, दंगल नियंत्रक पथके, शीघ्र कृती दल आणि फोर्सवन आदी विशेष पथकांवरही सुरक्षेची जबाबदारी आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मुंबई पोलिस आयुक्तालयातील सुसज्ज मुख्य नियंत्रण कक्षातून शहरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?