Mumbai News Pressure On Csmt Will Be Reduced Due To The Expansion Of This Platform The Local Service Of 15 Coaches Will Be Doubled 
ताज्या बातम्या

Mumbai Local : CSMT स्थानकावरील ‘हा’ प्लॅटफॉर्म लवकरच मोठा होणार, 15 डब्यांच्या लोकल्सची फेऱ्यांमध्ये वाढ होणार

प्लॅटफॉर्म क्रमांक 6 लवकरच मोठा होणार असून मार्च 2026 पासून येथे थेट 15 डब्यांच्या लोकल धावू शकणार आहेत.

Published by : Riddhi Vanne

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 6 लवकरच मोठा होणार असून मार्च 2026 पासून येथे थेट 15 डब्यांच्या लोकल धावू शकणार आहेत. यामुळे सध्या मर्यादित असलेल्या सेवा वाढून प्रवाशांना अधिक सोयीचा प्रवास मिळणार आहे.

नवीन व्यवस्था सुरू झाल्यानंतर 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या जवळपास दुप्पट होतील. त्यामुळे गर्दीच्या वेळेत होणारी कोंडी कमी होईल आणि सीएसएमटी–कुर्ला व सीएसएमटी–ठाणे मार्गावर मोठा दिलासा मिळेल. यासाठी जुनी, वापरात नसलेली इमारत हटवून स्टेशन विस्ताराचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाकडून देखभाल सुविधाही वाढवण्यात येणार असून कारशेडमधील पायाभूत कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहेत. एकूणच, या बदलांमुळे सीएसएमटीची क्षमता वाढणार असून लोकल प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.

थोडक्यात

  1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

  2. प्लॅटफॉर्म क्रमांक 6 लवकरच मोठा होणार

  3. मार्च 2026 पासून थेट 15 डब्यांच्या लोकल्स धावणार

  4. सध्या मर्यादित असलेल्या सेवा वाढणार

  5. प्रवाशांना अधिक सोयीचा आणि आरामदायक प्रवास मिळणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा