ताज्या बातम्या

Mumbai Police : मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन; एकजण ताब्यात

मुंबई पोलिसांचे तातडीने कारवाई; अंधेरीत संशयास्पद बॅगचा शोध

Published by : Team Lokshahi

शुक्रवारी पहाटे मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात एक धमकीचा फोन आला. एका महिला पोलीस शिपायाने हा कॉल उचलला. अंधेरीच्या मुकुंद नगर भागातील मरोळ पाईपलाईनजवळील अनमोल अपार्टमेंटमध्ये एक संशयास्पद बॅग ठेवलेली असून त्यामध्ये बॉम्ब किंवा शस्त्र असण्याची शक्यता आहे. असे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. अशी माहिती मिळताच संबंधित महिला पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ कळवले. यानंतर संपूर्ण यंत्रणा सतर्क करण्यात आली.

तपासासाठी पोलिसांनी तत्काळ दिलेल्या ठिकाणी धाव घेतली आणि संशयावरून एका १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. कुटुंबीयांकडून माहिती घेतली असता, संबंधित तरुण ऑटीझमने ग्रस्त असून तो अज्ञानीपणे अनेक गोष्टी बोलत असल्याचे समजले. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी सखोल तपासणी केल्यानंतर कोणताही बॉम्ब किंवा शस्त्र आढळले नाही.

गेल्या वर्षभरात अशा प्रकारच्या शंभरहून अधिक खोट्या धमक्या मुंबई पोलिसांना मिळाल्या आहेत. एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, "प्रत्येक माहितीची गंभीरतेने दखल घ्यावी लागते कारण कोणत्याही इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्याचा धोका घेता येत नाही. अशा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल होतो आणि आरोपीला अटकही केली जाते. मात्र, अशा घटनांवर कारवाईसाठी स्वतंत्र व कठोर कायदा नसल्याने आरोपी लवकर जामिनावर सुटतो. त्यामुळे कठोर कायद्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले".

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pandharpur : चंद्रभागा नदीत तीन महिला बुडाल्या; दोन महिलांचा मृत्यू तर एका महिलेचा शोध सुरू

Uddhav Thackeray : "'ही' आमच्याकडून झालेली सर्वात मोठी चूक”, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य चर्चेत

Uddhav Thackeray On Thackeray Brand : उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात: 'ठाकरे' म्हणजे महाराष्ट्राची ओळख

मिरचीची भजी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या