मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना मोठा दिलासा मिळाला आहे. पांडे यांच्या आयसेक कंपनीविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला होता. आयसेकनं ऑडिट केलेल्या २ स्टॉकब्रोकर्सचं ऑडिट केलं होतं. सीबीआयने त्यांच्याशी संबंधित कंपनीच्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला.
पांडे यांच्या कंपनीविरोधात सीबीआयनं केस दाखल केली होती. या केसचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयनं विशेष कोर्टासमोर सादर केला आहे. याची पुढची सुनावणी 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. CBIकडून कंपनीविरोधातील केसचा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. को-लोकेशन स्कॅम प्रकरणी हा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला असून खटला पुढे चालवण्याएवढे पुरेसे पुरावे नाहीत असे सीबीआयने म्हटले आहे.