chitra wagh urfi javed  Team Lokshahi
ताज्या बातम्या

उर्फीच्या अडचणीत वाढ; वाघांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

उर्फी जावेद नेहमी आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

उर्फी जावेद नेहमी आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे.चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदविरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर ही बाई मला ज्यादिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाडच रंगवेन, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी उर्फीला इशारा दिला होता.

यावर उर्फीने आता प्रत्युत्तर दिले असून चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचले आहे. यावेळेस भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ आता तिच्या फॅशनमुळे उर्फी जावेदवर भडकल्या आहेत. त्यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे आयुक्त तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेत पत्र दिले होती.

मुंबई पोलिसांनी आता उर्फी जावेदला समन्स बजावलं आहे. त्यामुळे उर्फीच्या अडचणीत वाढ झाली आहे.अंबोली पोलीस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार आहे. उर्फीला आज हजर होण्याची नोटीसही जारी करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी ही कारवाई होत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे यांची या प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत