थोडक्यात
मनोज जरांगे पाटील यांना थेट मुंबई पोलिसांची नोटीस
10 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारणारे मनोज जरांगे पाटलांची अडचण वाढली आहे. मुंबईतील आझाद नगर पोलीसांनी मनोज जरांगे पाटील आणि विरेंद्र पवार यांना नोटीस जारी केली आहे. मार्च महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीशीत जरांगे पाटलांना 10 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मार्च-एप्रिलमध्ये मनोज जरांगे पाटील, विरेंद्र पवार आणि आणखी काही सहकाऱ्यांवर मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. मनोज जरांगे पाटील आणि सहकाऱ्यांना यात तपासाच्या अनुशंगाने चौकशी करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. 10 तारखेला या नोटीशीत त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.