दरवर्षी पावसाळ्यामध्ये रेल्वे रुळामध्ये पाणी साचुन मुंबईची लोकल सेवा ठप्प होत असते.आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. यंदा ही निर्धारित वेळेपुर्वीच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्यानंतर मुबंईमध्ये ठिकठिकाणी रुळावर पाणी साचुन लोकल सेवा बंद झाली होती. यामुळे आता रेल्वे प्रशासनाने त्यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने रेल्वे मार्गावर पाणी साचुन रेल्वे सेवा बंद होऊ नये यासाठी विशेष सल्लागाराची नेमणुक करण्यात येणार आहे. यामुळे आता पावसाळ्यात सुद्धा रेल्वेसेवा अविरत पणे चालणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांचे अच्छे दिन लवकरच येणार आहे.
पावसाळ्यामध्ये अनेकदा रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि ते रूळ पाण्याखाली जातात आणि पुरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रवाशांना कामावर जाण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते. अयोग्य ड्रेनेजची व्यवस्था, गाळ साचणे, कचरा यामुळे दरवर्षी रेल्वे रुळावर पावसाळ्यामध्ये पाणी साचून रेल्वे सेवा बंद होते. ह्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एमआरव्हीसी नवा प्रयोग करत ह्या पुरपरिस्थितीवर मात करण्यासाठी च्या योजनांबाबत कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत.
त्याच धर्तीवर एक मास्टर प्लॅन आखला जाणार आहे. यामध्ये ज्या कंपनीची निवड केली जाईल त्यांच्याकडुन संपुर्ण वर्षभर विविध उपाययोजनांची माहिती घेऊन त्याद्वारे प्लॅन आमलात आणला जाणार आहे. ही संपुर्ण योजना प्रकल्प एमयूटीपी- 3अ अंतर्गत राबविण्यात येणार आहे. यासाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) ही बँक आर्थिक मदत करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी साधारण 877 कोटी खर्च अपेक्षित असुन यासाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे.