ताज्या बातम्या

Mumbai Rain Special Report : पहिल्या पावसातच मुंबई जलमय; आता स्पेशल रिपोर्ट वाचा एका क्लिकवर

मुंबईत पावसाचा तांडव: गुडघाभर पाणी साचलं, वाहतुकीची कोंडी; स्पेशल रिपोर्ट वाचा.

Published by : Riddhi Vanne

मुंबईकर आठवड्याची सुरूवात करण्यासाठी घराबाहेर पडला. डबा, छत्री घेऊन बॅग सांभाळत तो रस्त्यावर उतरला. पण मुसळधार पावसाने त्याची वाट अडवली. अनेक भागात गुडघाभर पाणी साचल्यामुळे चाकरमान्यांना तारेवरची कसरत करावी लागली. तर काही भागात वाहतुकीचा प्रचंड मोठा खोळंबा झाला. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या. आता वाचा मुंबईला पावसाने कसं झोडपून काढलं? हे सांगणारा एट-टू-झेड रिपोर्ट

वाईप- मुंबईत 'वर्षा'तांडव

मुंबईला पावसाने असं काही झोडपून काढलं की, मुंबईकरांची अक्षरश: त्रेधातिरपीट उडाली. मुंबईतल्या जे. जे. फ्लायओव्हर भागात तर गुडघाभर पाणी साचलं होतं... त्यातूनच वाट काढत गाड्या मुंग्यांसारख्या पुढे सरकत होत्या. तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावर प्रंचड मोठी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

वाईप- मुंबईत 'वर्षा'तांडव

केईएम हॉस्पिटलच्या परिसरातही पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलं... ज्यामुळे वाहतुकीची कोंडी तर झालीच. पण त्याचसोबत, येणाऱ्या जाणाऱ्या मुंबईकरांनाही पाण्यातून वाट काढावी लागली.

वाईप- मुंबईत 'वर्षा'तांडव

ज्या दादर चौपाटीवर महाराष्ट्रभरातून लोक येत असतात, तिथंही जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.

वाईप- मुंबईत 'वर्षा'तांडव

पावसाळा म्हटलं की मुंबईकरांना सर्वात आधी आठवतो तो हिंदमाता परिसर... हिंदमाता परिसरात दरवर्षी पाणी तुंबतं आणि वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असतो. यावर्षीही तशीच अवस्था झाली.

वाईप- मुंबईत 'वर्षा'तांडव

मुंबईत जाण्यासाठी ज्या रस्त्याचा वापर मुंबईकर करत असतात, त्यात सर्वात महत्त्वाचा भागा असतो किंग्ज सर्कल... किंग्ज सर्कल भागातही पावसाने दाणादाण उडवली

वाईप- मुंबईत 'वर्षा'तांडव

मरिन लाईन भागात एका बाजूल समुद्र उधाणलेला होता. तर दुसरीकडे पावसाने मात्र अक्षरश: तांडव सुरू केलं होतं.

वाईप- मुंबईत 'वर्षा'तांडव

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथेही मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची त्रेधातिरपीट उडाली आणि रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या

वाईप- मुंबईत 'वर्षा'तांडव

वांद्रे भागातही कालपासून सुरू झालेल्या पावसाने जराही उसंत घेतली नसल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचलं आणि वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या.

वाईप- मुंबईत 'वर्षा'तांडव

तर दुसरीकडे जिला मुंबईची लाईफलाईन समजली जाते. त्या मुंबईच्या लोकलच्या वेळापत्रकाचेही तीनतेरा वाजले... इंडिकेटरवरचे आकडे आणि ट्रेनच्या येण्याच्या वेळा यांच्या पाठशिवणीचा खेळ सुरू होता... रेल्वेचे ट्रॅक पावसाच्या पाण्यात बुडून गेले होते... त्यातूनही वाट काढत लोकल कासवगतीने धावत होत्या... त्यामुळे फ्लॅटफॉर्मवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली...

वाईप- मुंबईत 'वर्षा'तांडव

तर अशा पद्धतीने रविवारची सुट्टी घरात घालवून, आराम करून मुंबईकर बाहेर पडला... आणि आठवड्याची सुरूवात करू लागला... तर त्याच्या वाटेत मुसळधार पावसाने पाण्याचा लोंढा निर्माण झाला... आता हा पाऊस कधीपर्यंत अशीच वाट अडवत राहणार नाही असा सवाल मुंबईकरांना पडला आणि प्रत्येक मुंबईकरांच्या तोंडात एकच वाक्य होतं.... पावसानं ठरवलं, आता थांबायचं नाय...

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली