मुंबई विद्यापीठ हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आलेले बघायला मिळते. आता विद्यापीठाच्या एका चुकीमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना प्रदान केलेल्या पदवी प्रमाणपत्रावरील विद्यापीठाच्या बोधचिन्हावरील मुंबई नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक झाल्याचे चांगलीच नाचक्की झाली.याप्रकरणी विद्यापीठाने कारवाईचा बडगा उचलत चार उपकुलसचिवांवर कारवाई करत त्यांच्या बदल्या केल्या आहेत. विद्यापीठाच्या या कारवाईमुळे प्रशासनात चांगलीत खळबळ उडाली आहे.