ताज्या बातम्या

Mumbai Water Supply : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पाणीपुरवठा ३० तासांसाठी बंद

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठा बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते गुरुवारी ६ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३० तासांसाठी बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा साठा करून काटकसरीने वापर करावा.

Published by : shweta walge

मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. पुढील काही दिवस मुंबईच्या काही भागातील लोकांना पाणी जपून वापरावं लागणार आहे.  पूर्व व पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठा बुधवारी तब्बल ३० तासांसाठी बंद राहणार आहे. नवीन २४०० मिमी व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३० तासांच्या कालावधीत भांडुप, कुर्ला, अंधेरी ते वांद्रे पूर्व भाग आणि धारावी, दादर येथील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगद्या दरम्यान मुंबई महानगरपालिकेमार्फत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे १८०० मिमी व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम या दोन जलवाहिन्या अंशत: खंडित करून नवीन २४०० मिमी व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. बुधवार, ५ फेब्रुवारी सकाळीपासून ते ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम सुरू राहणार आहे. यावेळी एस, एल, के पूर्व, एच पूर्व, आणि जी उत्तर विभागांतील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहील.

नागरिकांनी, आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून काटकसरीने वापर करावा. जलवाहिनीच्या कामानंतर पुढील काही दिवस गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या विभागात पाणीपुरवठा बंद

१) एस विभाग : श्रीरामपाडा, खिंडीपाडा, तुळशेतपाडा, मिलिंद नगर. नरदास नगर, शिवाजी नगर, मरोडा हिल, भांडुप (पश्चिम), गौतम नगर, फिल्टर पाडा, महात्मा फुले नगर, पासपोली गाव, तानाजीवाडी उदंचन केंद्र, मोरारजी नगर. सर्वोदय नगर, गावदेवी टेकडी. तुळशेतपाडा, टेंभीपाडा, नरदास नगर, रमाबाई नगर १ आणि २, साई हिल भांडुप  जलाशय येथून होणारा पाणीपुरवठा (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

एस विभाग : क्वारी मार्ग, प्रताप नगर मार्ग, जंगल मंगल मार्ग, टेंभीपाडा, गावदेवी मार्ग, दत्त मंदीर मार्ग, लेक मार्ग, सोनापूर जंक्शन ते मंगतराम पेट्रोल पंपपर्यंतचा लालबहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर, भांडुप (पश्चिम), शिंदे मैदान जवळील परिसर, प्रताप नगर मार्ग, फुले नगर टेकडी, रामनगर उदंचन केंद्र, रावते कंपाऊंड उदंचन केंद्र, हनुमान टेकडी, अशोक टेकडी,  (नवीन हनुमान नगर) (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

२) एल विभाग : कुर्ला दक्षिण - काजूपाडा, सुंदरबाग, नवपाडा, हलावपूल, न्यू मील मार्ग, कपाडिया नगर, नवीन म्हाडा वसाहत, परिघखाडी, तकिया वॉर्ड, महाराष्ट्र काटा, गफुर खान इस्टेट, पाईप लाईन मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग (पूर्व व पश्चिम), क्रांती नगर, संभाजी चौक, रामदास चौक, अण्णा सागर मार्ग (दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

एल विभाग : कुर्ला उत्तर – ९० फीट रोड, कुर्ला – अंधेरी मार्ग, जरीमरी, घाटकोपर – अंधेरी जोडरस्ता, साकीविहार मार्ग, मारवा उद्योग मार्ग भाग, सत्यनगर पाईपलाईन (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

३) जी उत्तर विभाग : धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जस्मीन मील मार्ग, माहीम फाटक, ए. के. जी. नगर (दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

जी उत्तर विभाग : जस्मिन मील मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास मार्ग, ६० फीट मार्ग, ९० फीट मार्ग, संत कक्कया मार्ग, एम. पी. नगर धोरवडा, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

४) के पूर्व विभाग : विजय नगर मरोळ, मिलीट्री मार्ग, वसंत ओॲसिस, गावदेवी, मरोळ गाव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा (दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

के पूर्व विभाग : ओमनगर, कांतीनगर, राजस्थान सोसायटी, साई नगर (तांत्रिक क्षेत्र) सहार गाव, सुतारपाखाडी (पाईपलाईन क्षेत्र) (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

के पूर्व विभाग : आंतरराष्ट्रीय विमानतळ व सिप्झ- मुलगाव डोंगरी, एम. आय. डी. सी., मार्ग क्रमांक १ ते २३, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

के पूर्व विभाग : चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व २, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरतसिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदीर रोड, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांतीनगर (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

के पूर्व विभाग : कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी. ऍन्ड. टी. वसाहत (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

५) एच पूर्व विभाग : वांद्रे टर्मिनस (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

एच पूर्व विभाग : ए. के. मार्ग, खेरवाडी सर्व्हिस रोड, बेहराम पाडा, खेरनगर, निर्मल नगर (वांद्रे पूर्व) (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसामुळे 366 रस्ते बंद, 929 ठिकाणी वीजपुरवठा खंडित

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा