उन्हाचा कडाका वाढला असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी कपात करण्यात येत असून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक ठिकाणी पाणीकपात करण्यात येत आहे तर काही ठिकाणी पाणीच येत नाही अशी परिस्थिती आहे.
यातच आज नाहूर, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळीच्या पूर्व भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भांडुपमध्ये जलवाहिनी जोडणीचं काम केलं जाणार असल्याने हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी 3.30 ते 11.30 वाजेनंतर पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
जल जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, पाण्याचा पुरेसा साठा करून पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.