Mayor of Mumbai  
ताज्या बातम्या

Mayor of Mumbai : मुंबईला नवा महापौर मिळणार! महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 11 फेब्रुवारीला नावावर शिक्कामोर्तब

मुंबई महानगरपालिकेतील महापौर निवडीबाबत मोठी हालचाल सुरू झाली आहे. महापौरपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 7 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

Published by : Riddhi Vanne

Mayor of Mumbai : मुंबई महानगरपालिकेतील महापौर निवडीबाबत मोठी हालचाल सुरू झाली आहे. महापौरपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 7 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर 11 फेब्रुवारी रोजी नव्या महापौराच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. याच दिवशी दुपारी 12 वाजता विशेष सभा बोलावण्यात येणार असून सभेला सुरुवात होण्याच्या अगदी 15 मिनिटे आधीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.

दरम्यान, राज्यातील सर्व 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. मुंबईत हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले ठेवण्यात आले असून ठाण्यात अनुसूचित जातीसाठी आरक्षण लागू करण्यात आले आहे.

2026 च्या निवडणूक निकालांनंतर मुंबईच्या राजकारणात नवी समीकरणे तयार झाली आहेत. 227 सदस्यांच्या सभागृहात भाजप सर्वाधिक जागांसह आघाडीवर आहे. ठाकरे गटाची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असून इतर पक्षांनाही मर्यादित प्रतिनिधित्व मिळाले आहे. यावेळी अमराठी नगरसेवकांची संख्या वाढल्याने आगामी निर्णयांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

थोडक्यात

  1. मुंबई महानगरपालिकेतील महापौर निवडीसाठी मोठी हालचाल सुरू

  2. महापौरपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

  3. 7 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख

  4. 11 फेब्रुवारी रोजी नव्या महापौराच्या नावावर शिक्कामोर्तब होणार

  5. याच दिवशी दुपारी 12 वाजता विशेष सभा आयोजित

  6. सभेला सुरुवात होण्याच्या 15 मिनिटे आधीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुभा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा