Admin
ताज्या बातम्या

युथ काँग्रेसची सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर पोस्टरबाजी; सचिन तुझे देशप्रेम कुठे गेले? मूग गिळून गप्प का?

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरु केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरु केलं आहे. कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

त्यावरुन आता युथ काँग्रेसने बुधवारी सचिन तेंडुलकरच्या बंगल्याबाहेर एक पोस्टर लावलं आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकरजी भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये तुम्ही मूग गिळून गप्प का? शेतकरी आंदोलनावर बोलणाऱ्या परकीय महिला खेळाडूला सणसणीत उत्तर तुम्ही दिलं होतं की, आमच्या देशांतर्गत प्रश्नात तू नाक खुपसू नकोस. आणि आज मात्र सचिन तुझे देशप्रेम कुठे गेले?

तसेच क्रीडा विश्वातील तुम्ही देव माणूस आहात. एक भारतरत्न देखील आहात. मात्र जेव्हा खेळ विश्वातील काही महिला लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत. तेव्हा मात्र आम्हाला तुमच्यातील माणूस आणि तुमच्यातील माणुसकी कोठेही दिसून येत नाही.

सीबीआय, इन्कम टॅक्स, या सगळ्यांच्या धाडी पडतील म्हणून तू कुठल्यातरी दबावाखाली आहेस काय? असे अनेक सवाल या पोस्टरमधून सचिनला विचारण्यात आले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा