ताज्या बातम्या

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईत आजपासून 10 टक्के पाणीकपात

मुंबईत आज, सोमवारपासून 2 डिसेंबरपर्यंत 10 टक्के पाणीकपात करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

Published by : Team Lokshahi

मुंबईत आज, सोमवारपासून 2 डिसेंबरपर्यंत 10 टक्के पाणीकपात करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टीम’मधील दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. तातडीच्या दुरुस्ती कामामुळे 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत मुंबई महानगरात तसेच बृहन्मुंबई महापालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

संपूर्ण मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर ते शनिवार दिनांक 2 डिसेंबर असे तेरा दिवस ही पाणी कपात असेल. त्यामुळे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असून या कालावधीत नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Shirsat Viral Video : पैशांनी भरलेल्या बॅगेसोबत संजय शिरसाट; 'त्या' Viral Video बाबत स्पष्टचं म्हणाले...

Panvel : पनवेलमध्ये उभारणार विज्ञानप्रेमींसाठी अद्वितीय अंतराळ संग्रहालय

Latest Marathi News Update live : 50 खोक्यांमधील एक खोका आज दिसला, संजय शिरसाटांच्या व्हिडिओवरून आदित्य ठाकरेंचा टोला

Latest Marathi News Update live : बच्चू कडू यांच्या 'सात बारा कोरा' यात्रेचा आज पाचवा दिवस