Water supply cut off 
ताज्या बातम्या

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 29 आणि 30 नोव्हेंबरला पाणीकपात

मुंबईत 29 आणि ३० नोव्हेंबरला पाणीकपात असणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईत 29 आणि ३० नोव्हेंबरला पाणीकपात असणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईतील काही ठिकाणचा पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे. मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये मंगळवारी, 29 नोव्हेंबर सकाळी 8.30 वाजल्यापासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 8.30 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे.

मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा वाढवण्यासाठी आणि पाणीपुरवठ्याचे जाळे आणखी मजबूत करण्यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने वेरावली ते घाटकोपर दरम्यान, 6.6 किलोमीटरचा बोगदा बांधला जात आहे. के-पूर्व भागात अंधेरी पूर्व, एमआयडीसी, सीप्झ, जोगेश्वरी पूर्व आदी ठिकाणांचा समावेश आहे. गुंदवली, नेहरू नगर आणि आझाद नगर या भागात 29 नोव्हेंबर रोजी पाणीकपात होणार आहे. तर आनंद नगर, समर्थ नगर आणि शेर-ए-पंजाब भागात 30 नोव्हेंबरला पाणीपुरवठा कपात होणार आहे. तर, उर्वरित भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

मुंबईतील के-पश्चिम या प्रभागातील पाणीपुरवठा संपूर्णपणे बंद असणार आहे. तर, के-पूर्व, एच-पश्चिम, एच-पूर्व, पी-दक्षिण, एस, एल आणि एन या प्रभागातील काही ठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही. तर, के-पूर्व, जी-उत्तर, पी-दक्षिण या प्रभागात पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, हा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. एच-पश्चिम प्रभागातील पाणीपुरवठ्याची वेळ कमी करण्यात येणार आहे. तर, 30 नोव्हेंबर रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. के पश्चिम वॉर्डात राहणार्‍या सुमारे 7.5 लाख लोकांना 24 तासांच्या पाणीकपातीचा फटका बसेल असा अंदाज आहे. ओशिवरा, लोखंडवाला, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि जुहू यासारख्या ठिकाणी 24 तास पाणी पुरवठा बंद असणार आहे. या या प्रभागात असणाऱ्या महापालिकेच्या कूपर रुग्णालयासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

BEST Bus On Special Report : बेस्ट चांगल्या दिवसांच्या वाटेवर, बेस्टच्या उत्पन्नात मोठी वाढ

Latest Marathi News Update live : नांदेडमध्ये परिचारिका संघटनेचे काम बंद आंदोलन

Jitendra Awhad vs Gopichand Padalkar : विधानभवनातील गोंधळावर उद्धव ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया; "गुंडांना पास कोणी दिले, याचा शोध घ्या....!

shravan 2025 : महाराष्ट्रात 25 जुलैपासून शुभारंभ, चार श्रावणी सोमवारांसह सणांचा महापर्व, जाणून घ्या...