Mumbai Air Pollution 
ताज्या बातम्या

Mumbai Pollution : मुंबईची हवा प्रदूषित! AQI 104 वाढीमागे कोण?

मुंबईचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) 104 वर पोहोचला असून तो ‘मध्यम’ श्रेणीत नोंदवला गेला आहे.पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित बांधकाम कामे आणि हवामानातील बदल यांना तज्ज्ञांनी यासाठी जबाबदार ठरवले आहे.

Published by : Varsha Bhasmare

मुंबईचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) 104 वर पोहोचला असून तो ‘मध्यम’ श्रेणीत नोंदवला गेला आहे.पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित बांधकाम कामे आणि हवामानातील बदल यांना तज्ज्ञांनी यासाठी जबाबदार ठरवले आहे. रविवारी मुंबईचा सरासरी AQI 104 इतका नोंदवला गेला, तर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) सारख्या काही भागांत तो ‘गंभीर’ श्रेणीत होता. या वाढीचे मुख्य कारण म्हणून शहरातील मोठ्या प्रमाणातील बांधकाम प्रकल्प, वाहनांमधून होणारे प्रदूषण आणि हिवाळ्यातील हवामान बदल यांकडे IIT आणि IMD च्या तज्ज्ञांनी बोट दाखवले आहे. बांधकाम आणि वाहनांमधून होणारे प्रदूषण मुंबई आणि उपनगरांमध्ये AQI वाढीसाठी मुख्यत्वे कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. IIT मुंबईचे हवामान वैज्ञानिक अंशुमान मोदक यांनीही हे उत्सर्जनच प्रदूषणाचे प्राथमिक स्रोत असल्याचे पुष्टी केली आहे.

शहरात मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प सुरू

मुंबईत अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने सुरू आहेत—मेट्रो रेल्वे लाईनपासून ते रस्ते, पूल आणि इतर बांधकामकामे जोरात सुरू आहेत. झोपड्या, चाळी, मिल आणि औद्योगिक भागांचेही गगनचुंबी इमारतींमध्ये रुपांतर होत आहे, ज्यामुळे बांधकामाची गती वाढली आहे. IMD मुंबईच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनीही बांधकाम कामे AQI वाढीचे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले. त्याबरोबर हिवाळी हवामानाचे घटकही परिस्थिती अधिक बिघडवतात असे त्यांनी स्पष्ट केले.

तज्ज्ञ काय म्हणतात?

नायर यांच्या मते, आकाश स्वच्छ असताना आणि वाऱ्याचा वेग कमी झाल्यास जमिनीवरील तापमानात लगेच बदल होतो . यामुळे थंड हवेची एक परत गरम हवेच्या खाली तयार होते. थंड हवा घन असल्यामुळे खाली बसते आणि प्रदूषण हवेतुन जास्त वर जाऊ शकत नाही . त्यामुळे वायू गुणवत्ता खालवते. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये उंच इमारतींमुळे वाऱ्याचा प्रवाह मंदावतो, ज्यामुळे प्रदूषणाचा प्रसार आणखी कमी होतो.

AQI चे आदर्श स्तर काय? AQI चे वर्गीकरण असे आहे:

0–50: चांगला

51–100: समाधानकारक

101–200: मध्यम

401–500: गंभीर

BMC ची कारवाई

वायू गुणवत्ता सतत घटत असल्याने BMC ने प्रदूषण नियंत्रणासाठी अनेक उपाय केले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये BMC ने 28 मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.

  • बांधकाम स्थळांना धातुच्या पत्र्यांची कुंपणे व हिरवा कापड

  • नियमित पाण्याचा फवारा

  • मलब्याचे योग्य साठवण व वाहतूक

  • धूर शोषण यंत्रणा

पर्यावरणासाठी नियमांचे कडक पालन- प्रदूषण वाढवणाऱ्या 53 बांधकाम स्थळांना अलीकडेच BMC ने नोटिस देऊन काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा