मुंब्रा अपघात प्रकरणी बुधवारी निकाल येणे अपेक्षित होतं. मात्र आज या प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार असून निकाल येण्याची शक्यता आहे. मुंब्रा अपघात दोषी ठरवण्यात आलेल्या 2 इंजिनियर्सने अटकपूर्व जमीन अर्जासाठी ठाणे सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र त्यांच्या वकिलांनी सरकारी वकिलांचा दावा खोदर बुधवारी विविध चित्रफितींचे कोर्टासमोर सादरीकरण केले. यावेळी कसारा गाडीत गर्दी नव्हती असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता त्याचे देखील इंजिनियर्सचे वकील बलदेवसिंग राजपूत यांनी खंडण केले.