(Mundhwa Land Deal) पुणे जमीन घोटाळा प्रकरणाला नवी वळण देत सामाजिक कार्यकर्त्या आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील आघाडीचे चेहरे असलेल्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. आज दमानिया पुणे दौऱ्यावर आहे. त्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असून गुन्हा दाखल न झाल्यास कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी केली आहे.
थोडक्यात
अंजली दमानिया आज पुणे दौऱ्यावर
आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार
पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार
गुन्हा दाखल न झाल्यास कोर्टात धाव घेणार