ताज्या बातम्या

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 : कोल्हापूर जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक निकाल जाहीर, कोणाची बाजी कोण पराभूत जाणून घ्या एकाच बातमीमध्ये

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकींचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये मुरगूड, जयसिंगपूर, हातकणंगले, कुरुंदवाड यासारख्या ठिकाणी शिंदे गटाने विजय मिळवला.

Published by : Riddhi Vanne

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकींचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये मुरगूड, जयसिंगपूर, हातकणंगले, कुरुंदवाड यासारख्या ठिकाणी शिंदे गटाने विजय मिळवला, तर काँग्रेसने पेठवडगाव आणि शिरोळमध्ये यश मिळवले. अजित पवार गटाला कागल आणि चंदगडमध्ये विजय मिळाला आहे.

कोल्हापूरमधील प्रमुख निकाल

1. कागल नगरपरिषद

कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सविता भैय्या यांनी शिवसेनेच्या युंगेंधरा घाटगे यांचा पराभव केला आणि नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला.

2. गडहिंग्लज नगरपरिषद

गडहिंग्लज नगरपरिषदेतील निवडणुकीत राष्ट्रवादीचे महेश महादेव तुरबमठ यांनी महाआघाडीचे गंगाधर राजशेखर हिरेमठ यांना पराभव करत विजय मिळवला.

3. चंदगड नगरपंचायत

चंदगडमध्ये सुनिल कानेकर हे नगराध्यक्ष झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दयानंद काणेकर यांचा पराभव केला.

4. शिरोळ

शिरोळमध्ये शिव शाहू यादव पॅनलच्या योगिता कांबळे यांचा विजय झाला. त्यांनी आमदार अशोकराव माने यांच्या पत्नी सारिका माने यांचा पराभव केला. याशिवाय सध्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उमेदवार श्वेता काळे यांचाही पराभव झाला.

5. कुरुंदवाड नगरपरिषद

कुरुंदवाड नगरपरिषदेत शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यांची राजर्षी शाहू आघाडीच्या मनीषा डांगे विजयी झाल्या.

6. पन्हाळा

पन्हाळा नगरपरिषदेत जनसुराज्य पक्षाच्या जयश्री पवार यांनी तिन्ही अपक्ष उमेदवारांचा पराभव करत विजय मिळवला.

7. मलकापूर

मलकापूर नगरपरिषदेत जनसुराज्य आणि भाजपच्या उमेदवार रश्मी कोठवळे यांनी विजय मिळवला.

8. पेठवडगाव नगरपरिषद

पेठवडगाव नगरपरिषदेतील निवडणुकीत यादव आघाडीच्या विद्या पोल नगराध्यक्ष पदावर निवडून आल्या.

9. जयसिंगपूर नगरपरिषद

जयसिंगपूर नगरपरिषदेतील निवडणुकीत अपक्ष उमेदवार संजय पाटील यांचा विजय झाला. ते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या बंधू आहेत.

10. हुपरी नगरपरिषद

हुपरी नगरपरिषदेत भाजपचे उमेदवार मंगलराव माळगे यांनी विजय मिळवला.

11. हातकणंगले नगरपंचायत

हातकणंगले नगरपंचायतीत शिवसेनेचे उमेदवार अजित पाटील यांचा विजय झाला.

12. मुरगूड नगरपंचायत

मुरगूड नगरपंचायतीत शिवसेनेच्या सुहासिनी प्रवीणसिंह पाटील यांनी विजय मिळवला. यामुळे मंत्री हसन मुश्रीफांना धक्का बसला आहे.

13. आजरा नगरपंचायत

आजरा नगरपंचायतीत ताराराणी आणि भाजप आघाडीचे उमेदवार अशोक चराटी यांचा विजय झाला. काँग्रेसच्या संजय सावंत यांचा पराभव झाला.

थोडक्यात

  • कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकींचे निकाल जाहीर झाले आहेत.

  • या निवडणुकांमध्ये मुरगूड, जयसिंगपूर, हातकणंगले, कुरुंदवाड यासारख्या ठिकाणी शिंदे गटाने विजय मिळवला.

  • तर काँग्रेसने पेठवडगाव आणि शिरोळमध्ये यश मिळवले.

  • अजित पवार गटाला कागल आणि चंदगडमध्ये विजय मिळाला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा