अहिल्यानगरमध्ये मुस्लिम धार्मियांच्या भावना दुखवल्या प्रकरणी मुस्लिम समाजाचा रास्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे. गेल्या एक तासांपासून छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे रस्ता रोको आंदोलन सुरु आहे. माळीवाडा भागात असणाऱ्या बारा तोटी कारंजासमोर काही समाजकंटकानी मोहम्मद पैगंबर यांचे नाव जमिनीवर लिहून विटंबना करण्यात आली.
मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या नावाची विटंबना केल्या प्रकरणी अहिल्यानगरमध्ये मुस्लिम समाज संतप्त झाला आणि रस्त्यावर उतरला आहे. यानंतर कोतवाली पोलीस स्टेशन समोर शेकडो मुस्लिम बांधव झाले जमा झाले. तर यामुळे संभाजीनगर महामार्गावर वाहनांची कोंडी झाली आहे. अहिल्यानगरमध्ये धार्मिक तणावानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
यादरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी शांतता ठेवून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून एका संशयित आरोपिला ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे.