आज 1 नोव्हेंबरला मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेचा एल्गार काढणार सत्याचा मोर्चा सुरु झाला असून या मोर्चाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही ठाकरे बंधू सहभागी झाले आहेत.
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रीतसर दादरहून सीएसएमटीकडे लोकलने प्रवास केला. राज ठाकरेंनी दादर रेल्वे स्थानकावरुन ट्रेन पकडत चर्चगेट स्थानकापर्यंत प्रवास केला.
आता सध्या वेस्ट हॉटेल ऍन्डमध्ये विश्राम करत आहेत. आता मोठी अपडेट समोर आली आहे की, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे राज ठाकरे वेस्ट हॉटेल ऍन्डमध्ये दाखल झाले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहिसर विधानसभेतुन शेकडो कार्यकर्ते महाराष्ट्र गीत गात चर्चगेटला हजर झाले आहेत. त्यांच्यात मनसेचे अविनाश जाधव, बाळा नांदगावकर तसेच अनेक कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले आहेत.