Ganpati Bappa Arrives at Marathi Bigg Boss winner Shiv Thackeray's House with a Bang : मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा विराजमान झाले आहे ,सेलिब्रिटीही मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करतात. अमरावतीत बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घरी बाप्पाचं मोठ्या जल्लोषात वाजत गाजत आगमन झालं आहे. शिव ठाकरे स्वतः या आनंदात सहभागी झाला, त्याने कंबरेला ढोल बांधत ढोल वाजवण्याचा आनंद घेतला, यावेळी भन्नाट असा डान्स त्याने केला,शिव ठाकरेने वाजत गाजत गणरायाची मूर्ती त्याच्या घरी आणली आहे. शिवच्या घरच्या गणरायाच्या मूर्तीने लक्ष वेधून घेतलं आहे. शिवच्या घरची गणपती मूर्ती फारच सुंदर आहे. खड्यांनी ही बाप्पाची मूर्ती सजवण्यात आली आहे.
शिव ठाकरे अविवाहित असून त्याचं लग्न केव्हा होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली असते, दरवर्षी गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त लग्नाबाबतचा प्रश्न पत्रकार त्यांना विचारतात, जेव्हा बाप्पाची इच्छा असेल तेव्हा नक्की योग येईल राणी घरी येईल, माझी आई व बाबा पाच वर्षापासून माझ्या लग्नाच्या मागे लागले आहे असं उत्तर यावेळी त्यांनी लग्नाबाबत दिलं,आपल्या महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण गणपती बाप्पाचा असतो..तो नाचत गाजत व्हायला पाहिजे माझा हा फेवरेट सन गणपती बाप्पाचा आहे .मी मीडियाला काय मागितलं हे सांगणार नाही काही चांगल्या बाप्पाला गोष्टी सांगितल्या ज्यांनी मी खुश राहील लोकांच्या मदतीसाठी राहील माझे स्वप्न पूर्ण होतील अशी प्रतिक्रिया शिवने दिली आहे.