म्यानमार सैन्याकडून एका गावावर एअर स्ट्राईक झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये मुलं, पत्रकारांसह 100 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. एअर स्ट्राईकनंतर एक दीड तासाने एका हेलिकॉप्टरने गोळीबार केला.
म्यानमार सैन्याच्या फायटर जेटने लोक जमा झालेल्या ठिकाणी बॉम्ब टाकला. या हल्ल्यात जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाला. या घटनेने जगभरात खळबळ उडाली आहे. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर तुर्क यांनी एक निवेदन जारी केले आहे. यात संयुक्त राष्ट्रांनी म्यानमारच्या सैन्याकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकचा निषेध करण्यात आला आहे. त्यामुळे या हल्ल्यात नेमके किती मृत्यू झालेत याचा निश्चित आकडा समोर येऊ शकलेला नाही.