Ajit Pawar Death 
ताज्या बातम्या

Ajit Pawar Death : अजित पवारांच्या अंतिम प्रवासाचा रहस्य उघड? विमानतळ ते विमानात काय घडलं? पाहा CCTV फुटेजची मागणी

आता महाराष्ट्रात जोरदार राजकारण सुरु झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमोल मिटकरी यांनी ट्विट टाकत अनेक प्रश्न उपस्थितीत केले आहे.

Published by : Riddhi Vanne

Ajit Pawar Death : महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी घटना बुधवारी (दि. 28) सकाळी घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे बारामतीत चार्टर्ड विमान अपघातात निधन झाले. सकाळी सुमारे 8.45 वाजता बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमान कोसळले, या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक, दोन पायलट आणि एक महिला क्रू मेंबर यांचा समावेश आहे. अजित पवार हे 66 वर्षांचे होते. या अपघाताची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली बारामतीत वातावरण अत्यंत शोकाकुल झाले असून पवार कुटुंबीय, कार्यकर्ते आणि नागरिकांना अश्रू अनावर झाले. यावर आता महाराष्ट्रात जोरदार राजकारण सुरु झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमोल मिटकरी यांनी ट्विट टाकत अनेक प्रश्न उपस्थितीत केले आहे.

अमोल मिटकरी ट्विटमध्ये लिहितात की,

DGCA नी ब्लॅक बॉक्स ची सत्यपडताडणी अहवाल येण्याअगोदर आदरणीय अजित दादांचे दिनांक २८ जानेवारी २०२६ चे मुंबई विमानतळ मुख्य प्रवेशद्वारापासून ते विमानात बसेपर्यंतचे सर्व व्हीडीओ शुटिंग व CCTV फुटेज तत्काळ अधिकृतरित्या तात्काळ प्रसिद्ध करावे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा