ताज्या बातम्या

Battis Shirala : बत्तीस शिराळातील नागपंचमी जिवंत नागपूजाऐवजी प्रतिमा पूजन करुन साजरी

जगप्रसिद्ध बत्तीस शिराळातील नागपंचमी जिवंत नागपूजाऐवजी प्रतिमा पूजन करुन साजरी

Published by : Siddhi Naringrekar

संजय देसाई, सांगली

जगप्रसिद्ध असणारी सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळयातील नागपंचमी ही जिवंत नागाची पूजेसाठी प्रसिद्ध होती पण वन्यप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेमुळे न्यायालयाच्या आदेशानुसार जिवंत नागाची पूजा न करण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याने गेल्या काही दिवसापासून प्रतीकात्मक नागाची पूजा या ठिकाणी केली जाते.

शिराळा येथे हजारो वर्षांपासून जिवंत नागाची पूजा केली जात होती. शिराळा मध्ये महाजनांच्या घरी गोरक्षनाथ भिक्षा मागण्यास आले होते. यावेळी भिक्षा घालण्यास वेळ झाला आणि गोरक्षनाथ यांनी वेळ का झाला विचारला त्यावेळी महाजन यांच्या पत्नीने सांगितले नागाची पूजा करत होते, त्यावेळी गोरक्षनाथ यांनी जिवंत नागाची पूजा कर असे सांगितले आणि त्यावेळी पासून ही परंपरा 32 शिराळा मध्ये सुरू झाली. ही नाग पंचमी पाहण्यासाठी राज्यातून लोक येत असतात. 

शिराळ्याच्या नागपंचमीचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्व घरांमध्ये जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा होती. शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा  न्यायालयाच्या निर्णयानंतर खंडित झाली आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने कमीत कमी एक दिवस तरी आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यास मिळावी अशी भावना शिराळकरांनी केली आहे. 

शिराळात होणार्‍या नागपंचमी उत्सव सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरळीत पार पडावा याकरिता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ५००च्या आसपास पोलिस आणि १५० हून अधिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त शिराळा परिसरात तैनात ठेवण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Ganpati Visarjan 2025 : ढोल-ताशांच्या गजरात पुण्याची विसर्जन मिरवणूक संपन्न

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : 'निरोप घेतो आता आज्ञा असावी..., 33 तासानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Thane : ठाणेकरांना खुशखबर! मुंबई मेट्रो-11 प्रकल्पाला मंजुरी; ठाणे ते गेटवे प्रवास होणार अधिक सुलभ

Latest Marathi News Update live : लालबागच्या राजाची शेवटी आरती संपन्न; नऊ तासांच्या प्रयत्नानंतर राजा आता विसर्जनासाठी सज्ज