ताज्या बातम्या

नागपूर दुहेरी हत्याकांडाने हादरले; जावयानेच केली सासू-सासर्‍यांची हत्या

पत्नी आणि मुलीवरही कुऱ्हाडीने वार; गंभीर जखमी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्पना नलास्कार | नागपूर : दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर येत आहे. जावायाने मध्यरात्री वृद्ध सासू-सासर्‍यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. तर, पत्नी आणि मुलीवरही गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

भगवान खाडे आणि पुष्पा खाडे अशी मृतांची नावे आहेत. कल्पना यादव व मुलगी मुस्कान अनुक्रमे पत्नी आणि मुलीचे नाव आहे. तर नरमु यादव असे आरोपीचे नाव आहे.

नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत अमर नगर परिसरात हे दुहेरी हत्याकांड घडले आहे. दारूच्या नशेत मध्यरात्री सासू-सासरे भगवान आणि पुष्पा खाडे यांच्यावर कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. तर पत्नी आणि मुलावरही कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे. यामध्ये आरोपी नरमु यादवला जवळच्या जंगलातून पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता गेले तीन-चार दिवसांपासून कुटुंबात वाद सुरू होते. शनिवारी रात्री आरोपीने दारूच्या नशेत पुन्हा वाद उकरून काढले आणि ही घटना घडली, अशी माहिती समोर आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?