nagpur municipal corporation Team Lokshahi
ताज्या बातम्या

Nagpur : पालिकेची निवडणुकीसाठी महिला आरक्षण सोडत जाहीर, वाचा कोणत्या वार्डात किती?

Nagpur Election Reservation 2022 : राधाकृष्णन बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली आरक्षण सोडतीची प्रक्रिया

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्पना नालस्कर | नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिला आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली.

नागपूर शहराची ५२ प्रभागामध्ये विभागणी करण्यात आली असून त्रिस्तरीय प्रभागरचना करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण सदस्यसंख्या १५६ जागा असणार आहे. यापैकी ५० टक्के अर्थात ७८ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाद्वारे सर्वसाधारण महिलांकरिता ४४ जागा दिल्या आहेत. तर अनुसूचित जातीकरिता एकूण ३१ जागा आरक्षित असून त्यातील १६ जागा महिलांसाठी राखीव आहेत. व अनुसूचित जमातीकरीता १२ जागा राखीव असून त्यापैकी ६ जागा महिलांकरिता राखीव असून त्यांची सोडत मंगळवारी काढण्यात आली.

अनुसूचित जातीसाठी आरक्षित ३१ प्रभागाच्या चिठ्ठ्यांमधून महिलांच्या १६ जागा काढण्यात आल्या. यामध्ये प्रभाग क्रमांक १ अ, २ अ, १० अ, १३ अ, १४ अ, १५ अ, १६ अ, २० अ, २७ अ, ३० अ, ३७ अ, ३८ अ, ३९ अ, ४३ अ, ४५ अ आणि ५२ अ असे अनुसूचित जाती महिलांचे प्रभाग आरक्षण निश्चित करण्यात आले.

अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक ४ ब, १२ ब आणि ५१ ब या तीन प्रभागांची थेट निश्चित करण्यात आले. यानंतर उर्वरित ३ जागांसाठी अनुसूचित जमातीच्या उर्वरीत ९ जागामधुन ३ चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यामध्ये प्रभाग क्रमांक २४ अ, ११ अ आणि ३७ ब चे अनुसूचित जाती महिला प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यात आले.

महिलांच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण १७ चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. यापैकी १२ चिठ्ठ्या काढून त्यातून सर्वसाधारण माहितीकरीता १२ जागांचे आरक्षण जाहिर करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक ६ ब, १७ अ, २२ ब, २३ ब, २९ ब, ३१ ब, ३२ ब, ३५ ब, ४० ब, ४२ ब, ४८ ब आणि ४९ ब या १२ प्रभागांचे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात