ताज्या बातम्या

शिंदे-फडणवीस बोलून झाले मोकळे अन् जनतेच्या हाती भोपळे; पटोलेंचा हल्लाबोल

Published by : shweta walge

काल संभाजी नगरात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाड्यासाठी ५९ हजार कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर करण्यात आले. यावरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मराठवाड्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असतानाही तेथे दुष्काळ जाहीर न केल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

शिंदे-फडणवीस मुंबईप्रमाणे छत्रपती संभाजीनगरातही ‘बोलून झाले मोकळे’ आणि मराठवाड्यातील जनतेच्या हाती आले फक्त भोपळे, असा टोला पटोलेंनी लगावला आहे. मराठवाड्यातील जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळ बैठक घेतली. पण, त्यातून मराठवाड्याच्या जनतेला काहीही मिळालेले नाही.

५९ हजार कोटींच्या योजना दिल्याचा ढोल पिटला जात असला, तरी तो आकड्यांचा खेळ असून प्रत्यक्षात जनतेच्या हाती जेव्हा काही लागेल तेंव्हाच ते कळेल, अस म्हणत त्यांनी हल्लाबोल केला आहे.

दिनविशेष 15 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा निर्णय

HBD Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने करिअरमधून का घेतला होता ८ वर्षांचा ब्रेक?

Kartiki Gaikwad: लग्नाच्या चार वर्षांनी कार्तिकी झाली आई

Bhandara : भंडारा शहरातील खड्यात रांगोळी काढून आंदोलन