Nana Patole Team Lokshahi
ताज्या बातम्या

Nana Patole: "नक्कीच मी मुख्यमंत्री होणार" नाना पटोले यांचं वक्तव्य

भंडारा जिल्ह्यात बुधवारी प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांचं नाव न घेता "भावी हे भावीच राहतील", असं वक्तव्य केलं होत. त्यावर नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे.

Published by : Team Lokshahi

नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेलांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. भावी हे भावीच राहणार असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं होतं. या वक्तव्यावर नाना पटोले यांनी जोरदार पलटवार केला आहे. मी मुख्यमंत्री होणारच असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यानं मविआत बिघाडीची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

भंडारा जिल्ह्यात बुधवारी प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांचं नाव न घेता "भावी हे भावीच राहतील", असं वक्तव्य केलं होत. त्यावर नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे. "मला आमदार होऊ देत नव्हते. आमदार झालो, खासदार होऊ देत नव्हते खासदार झालो, विधानसभा अध्यक्ष सुध्दा झाले आणि आता मुख्यमंत्री होणारच" असं वक्तव्य नाना पटोले यांनी भंडारा येथे केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान