Nana Patole
Nana Patole Team Lokshahi
ताज्या बातम्या

बाळासाहेब थोरातांचा राजीनामा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात हा वाद विकोपाला गेला आहे. बाळासाहेब थोरात यांचा काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. यावरुन बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देखिल दिली होती.

यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. त्यांना मी सदिच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांचा आणखी राजकीय उत्कर्ष होवो अशा मी सदिच्छा देतो. बाकी राहिला विषय बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याचा, तर त्यांनी राजीनामा दिलेला नाही.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही यासंदर्भात बोलताना नाराजी व्यक्त केली होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांनी पत्र दिले होते. नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीवेळी पक्षाने दिलेल्या चुकीच्या एबी फॉर्मवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. याशिवाय बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचेही स्पष्ट केले आहे.

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...