आज विधानसभेचे विशेष अधिवेशन आहे. विधीमंडळात पुढील दोन दिवस नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार असून 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. यातच शपथविधी सुरु असताना विरोधी पक्षाचे आमदार विधानभवनातून बाहेर पडले असून विरोधी पक्षातील आमदारांनी सभात्याग केला आणि ईव्हीएमचा निषेध म्हणून आज विरोधक शपथ घेणार नाही आहेत.
याबाबत नाना पटोले म्हणाले की, मताचा अधिकार हा लोकशाहीतला सर्वात महत्वाचा भाग आहे. पण आता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मशिम हॅक करतात, 76 लाख मते ही अंधारात त्यांनी घेतली. या सगळ्या मागे मोठे गुपित आहे.
मारकडवाडीचे एक उदाहरण नाही. तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हे सरकार कसे आले आहे आणि कसा एवढा मोठा चमत्कार झाला? एवढी मोठी लोकप्रियता कशी यांच्याजवळ आली? हे कळायला कारण नाही.
यासोबतच ते म्हणाले की, आम्ही निवडून आलेलो लोक आहोत. पण आल्यानंतर जनभावना ज्या जनतेच्या आहेत या माध्यमातून आम्ही आज शपथ घ्यायची नाही. घ्यायची की नाही त्याचा निर्णय आम्ही अजून घेतलेला नाही. महाराष्ट्रातलं हे सरकार जनतेचं नाही. हे सरकार आपली खुशी आपण व्यक्त करतोय असं चित्र आपण पाहतो आहे. असे नाना पटोले म्हणाले.