Nana Patole 
ताज्या बातम्या

नाना पटोलेंचा महायुतीवर हल्लाबोल; म्हणाले, " नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या इशाऱ्यावर..."

"महाराष्ट्र शेतक्रांती निर्माण करण्याचा प्रयत्न करतं. शेतक्रांतीमध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे, त्या शेतकऱ्याला लुटण्याचं काम एकनाथ शिंदे आणि भाजप महाराष्ट्रात करत आहे"

Published by : Naresh Shende

Nana Patole Press Conference : महाराष्ट्र शेतक्रांती निर्माण करण्याचा प्रयत्न करतं. शेतक्रांतीमध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे, त्या शेतकऱ्याला लुटण्याचं काम एकनाथ शिंदे आणि भाजप महाराष्ट्रात करत आहे. या सरकारवर गुजरातचा प्रभाव आहे, हे लपलेलं नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा जे सांगतील, त्याच पद्धतीनं राज्यातील सरकार काम करत आहे. राज्यातल्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं काम सरकार करत आहे. ते तातडीनं थांबवलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या गायी-म्हशींच्या दुधाचा भाव तातडीनं वाढवून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस पक्ष करत आहे. नाहीतर काँग्रेस पक्ष या मुद्द्याला घेऊन शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावरची लढाई लढेल आणि संघर्ष करेल. ज्याप्रमाणे तेलंगणा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची भूमिका जाहीर केली. त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सरकारला करत आहोत.

आता २७ तारखेपासून महाराष्ट्राचं बजेट अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात सरकारने घोषणा करावी आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं सर्व कर्ज माफ करावं. ही आमची भूमिका आहे. भाजप विचाराचं सरकार ज्या राज्यात आहे, त्याच राज्यात नीटची पेपरफुटी झाली आहे. केंद्रातील सरकार किती आंधळी आणि बहिरी आहे, हे आता पुन्हा जाणवलेलं आहे. नीटच्या परीक्षेत ज्या पीजीच्या परीक्षा होत्या, त्या सरकारनेच जाहीर केल्या. मी देशभरातले काही व्हिडीओ पाहिले, जवळपास २ लाख मुलं आणि मुली या पीजीच्या परीक्षेत बसल्या होत्या. पीजीचे सेंटर फार कमी असतात.

विद्यार्थी त्या सेंटवर गेले आणि ऐनवेळी केंद्र सरकारने पीजीची परीक्षा रद्द केली. या तरुणांच्या भविष्यासोबत खेळण्याचा अधिकार भाजपला कुणी दिला? हा प्रश्न याठिकाणी निर्माण होत आहे. या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय करण्याचं पाप भाजप सरकार करत आहे. हे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. नीटच्या परीक्षा केंद्र सरकारने रद्द कराव्या, आमची अशी मागणी आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिली नाही. पोलिसांचा धाक राहिला नाही. राज्यातील सरकार शंभर टक्के भ्रष्टाचारी आहे. हे सरकार सक्षम राहिलं नाही, असंही नाना पटोले म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Teachers Protest : अधिवेशन संपेपर्यंत शिक्षकांच्या खात्यात जमा होणार इतका पगार; गिरीश महाजन यांनी दिले आश्वासन

Ambernath Viral Video : लिफ्ट बंद केल्याच्या रागातून 12 वर्षीय मुलाला बेदम मारहाण; अंबरनाथमधील CCTV Footage Viral

Latest Marathi News Update live : मंत्री गिरीश महाजन आझाद मैदानात शिक्षक आंदोलकांच्या भेटीला

IAF Plane Crash : राजस्थानात वायुसेनेचे विमान कोसळले; दोन्ही वैमानिकांनी गमावला जीव