ताज्या बातम्या

Nana Patole: हे सरकार जनतेतून नाही, निवडणूक आयोगाच्या करामतीनी आलेलं- नाना पटोले

नाना पटोले यांनी म्हटले की हे सरकार जनतेतून आलेलं नाही, तर निवडणूक आयोगाच्या करामतीनी आलेलं आहे. त्यांनी सध्याच्या सरकारवर टीका केली आहे.

Published by : Team Lokshahi

हे जनतेतून आलेलं सरकार नाही, निवडणूक आयोगाच्या करामतीनी आलं असं म्हणत नाना पटोलेंनी सरकारवर टीका केली आहे. अनेक मुद्द यावेळई नाना पटोलेंनी मांडले असून राज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी सर्व विभागाच्या जमिनी विकायला काढल्या आहेत. किती जमिनी वाचल्यात, संपत्ती विकण्याचे काम करणार आहे का? असा प्रश्न नाना पटोलेंनी सरकारला केला आहे.

पुढे नाना पटोले म्हणाले की, दुसरा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तो म्हणजे जनतेच्या खिशातून पैसे काढले जातील. महागाईत लोकांवर भार टाकणार आहात का? उत्पन्नाचे स्त्रोत वाढवत असताना जनतेवर भार टाकणार आहात का? याचा खुलासा करत विधानसभेत सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी. आज विदर्भाला काय मिळणार हे आज त्यांच्या उत्तरातून कळेल. फडणवीस यांनी अनुशेषाचे प्रश्न उपस्थित केले होते, आता बघुयात त्यांची काय भूमिका असेल... त्यानंतर जेल सुधारणेसाठी बिल आणलं होतं, सर्वांना जगण्याचा अधिकार आहे, कोणी कैदी म्हणून जन्माला येत नाही हे खरं आहे....

यानंतर नाना पटोले खाते वाटपवार बोलताना म्हणाले की, खरंतर आज मंत्रिमंडळातही ज्या घोषणा झाल्या, मंत्री झाले त्यांना पोर्टफोलिओ मिळाते नाहीत.... बिनपगारी सर्व मंत्री आहेत, सरकारनं सर्व खाती आपल्याकडे ठेवावी का? असं सर्व आहे... ही लोकशाहीची थट्टा आहे, निवडणूक आयोगाच्या भरोशावर हे सरकार निवडून आलं आहे..... जनतेचा तो अधिकार आहे, हे जनतेतून आलेलं आहे, सरकार स्वतःसाठी जगते आहे. नावाचे हे सर्व उपमुख्यमंत्री आहेत.... जनतेची भीती नाही, सरकार आपल्या हिशोबाने वागत आहे... गोसीखुर्द प्रकल्पाचे प्रश्न भयानक आहेत, त्याकाळी लोकांना नोकरीसंदर्भात आमिष दिले होते पूर्ण संस्कार घरं पुर्नवसन झालेलं नाही.....

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा