ताज्या बातम्या

"काय नाना तुम्ही पण..." चित्रा वाघ यांनी शेअर केला नाना पटोलेंचा 'तो' व्हिडिओ

चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले यांच्यावर काही आरोप केले आहेत.

Published by : Sudhir Kakde

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आता पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ शेअर केला असून, यावेळी त्यांच्या रडारवर काँग्रेस नेते नाना पटोले आहेत. नाना पटोले (Nana Patole) यांचा एका महिलेसोबतचा हा व्हिडिओ असून, यामध्ये ते त्या महिलेसोबत एखाद्या हॉटेलवर असल्याचं दिसतंय. "काय नाना...तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीत..." असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. या व्हिडिओमध्ये नाना पटोले हे सदरील महिलेसोबत मेघालयमधील चेरापुंजी येथे असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र नाना पटोलेंकडून याबद्दल अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.

चित्रा वाघ यांनी यापूर्वी महाविकास आघाडीमधील अनेक नेते, कार्यकर्त्यांच्या अशा व्हिडिओवरुन त्यांच्यावर आरोप केले होते. यामध्ये संजय राठोड, रघुनाथ कुचिक, मेहबूब शेख अशा अनेक नेत्यांवर चित्रा वाघ यांनी आरोप केले होते. मात्र या प्रकरणातील पीडितांनी नंतर आपली तक्रार बदलल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी यावर बोलताना सांगितलं की, या प्रकरणाविरुद्ध आमच्या वकिलांनी आता तक्रारी दाखल कऱण्यास सुरुवात केली असून, आम्ही या सर्व गोष्टींना कायद्यानं उत्तर देऊ असं नाना पटोले म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा