Admin
Admin
ताज्या बातम्या

वारीसेंच्या मृत्यूमागे नाणार रिफायनरीच्या दलालांचा हात - विनायक राऊत

Published by : Siddhi Naringrekar

लक्ष्मीकांत घोणसे - पाटील, रत्नागिरी

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात बातमी देणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांना गाडीने उडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या सगळ्या घटनेची गंभीर दाखल आता मराठी पत्रकार परिषदेकडूनही घेण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता विनायक राऊत यांनी म्हटले आहे. राऊत म्हणाले की, गेल्या एक वर्षात आंबेरकरांनी घातपात घडवून आणण्याचा दोन ते तीन घटना आहेत. तसेच न्यायालयात नागरिकांच्या अंगावर दगडफेक केली होती. त्याबाबत पोलीस ठाण्यात नोंद आहे. त्याच घटनांच्या पार्श्वभूमीवर कालची घटना घडली आहे. असे ते म्हणाले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, आंबेरकर यांनी यापूर्वी रिफायनरीला विरोध करणाऱ्यांच्या अंगावर वाहन चालवून अनेकांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. आंबेरकरांच्या या कारवायांच्या पार्श्वभूमीवर वारीसेंच्या झालेल्या मृत्यूची पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी. पत्रकाराचा अपघात नसून रिफायनरीच्या दालालाने घडवून आणलेला घातपात आहे. नागरिकांनी केलेल्या चौकशीच्या मागणीला माझा खंबीर पाठिंबा आहे. तसेच रत्नगिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही या प्रकरणाची चौकशीची मागणी करणार आहे."असे ते म्हणाले.

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Daily Horoscope 3 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष ३ मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"ज्यांनी गुन्हा केला नाही, त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम मोदी सरकारनं केलं", सांगलीच्या सभेत शरद पवारांचा हल्लाबोल